Setting Microsoft Office Default Language to Marathi

Setting Microsoft Office Default Language to Marathi

जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे लोकप्रिय लेखन-संपादन सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट ऑफिसची भाषा बदलता येऊ शकते. आपण ह्या ब्लॉगमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसची भाषा मराठी कशी निवडता येईल हे शिकू.

Techno-giant Microsoft enables its users to change the default language of Microsoft Office 2010, one of the widely popular word processing, spreadsheet, database management program. The Office suite, which comes with other interesting apps such as OneNote and Outlook, can be configured to show its content in Marathi, the official language of Indian state of Maharashtra. Read on.

1. मायक्रोसॉफ्ट च्या संकेत स्थळाला भेट देऊन डाउनलोड सेंटर मधून तुमच्या ऑफिसच्या व्हर्जनशी अनुकूल लेन्ग्यूवेज इंटरफेस पेक डाउनलोड करा. तो तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करा.

Go to the Microsoft Download Center and download and install a Language Interface Pack compatible with your version of Office.

2. मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड २०१० चालू करा.

Open Microsoft Office Word 2010 from the Start Screen.

3. रिबन इंटरफेसवर असणार्या File मेनूवर तुमच्या माउसचा कर्सर न्या आणि डावी किल्क करा.

Click the File menu on your Ribbon interface.

file-menu

4. तुमच्या स्क्रीनवर एक मेनू दिसेल, ज्यात तुम्हाला Options वर क्लिक करायचे आहे.

A new menu appears on your screen. Select Options.

options

5. आता तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डचे सगळे सेटीन्ग्स आपल्या स्क्रीन वर पाहू शकता. Language नावाच्या टॅब वर क्लिक करा.

Here we go. You can review all Word settings in this dialog. Click the Language tab.

language-tab

6. ह्या टॅब वर क्लिक केल्या नंतर तुमची स्क्रीन चार भागात विभागली जाईल ज्यात तुम्ही तुमच्या डोकमेण्ट वर कोणत्या भाषेत लिहायचे आहे ती एडिटिंग लेन्ग्यूवेज, स्क्रीन वर डिआलॉग्स मध्ये दिसणारी भाषा जिला डिस्प्ले लेन्ग्यूवेज म्हणता येईल ती, हेल्प वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्टेन्ट ज्या भाषेत उपलब्ध होते ती हेल्प लेन्ग्यूवेज, आणि लहानश्या नोटिफिकेशन मध्ये दिसणारी भाषा जिला स्क्रीनटीप लेन्ग्यूवेज म्हणतात, ह्या संबंधीची सेटीन्ग्स तुम्ही बदलू शकता.

This tab classifies your screen in four categories namely Editing Language, Display LanguageHelp Language, and Screentip Language. Editing language refers to the language used for editing a document. Display and help language determine the language to be used for showing dialog content and support documentations respectively. On the contrary, screen tip is a small sized window that shows tooltip notifications and pop-ups.

change-language-options
7. ह्या तिन्ही ठिकाणी मी मराठी भाषेला निवडत आहे आणि Set as Default नावाच्या बटनावर क्लिक करत आहे.

Select Marathi in all the three categories and click the corresponding Set as Default buttons.

8. एडिटिंग भाषा बदलल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक कन्फर्मेशन डायलॉग येईल, ज्यात तुम्हाला Yes वर क्लीक करायचे आहे.

After changing the editing language, a confirmation dialog will be displayed. Click Yes.

microsoft-office-default-editing-language-change-confirmation-box

9. त्यानंतर OK वर क्लिक करा, आणि त्यानंतर पुन्हा येणाऱ्या कन्फर्मेशन बॉक्समध्ये देखील OK वर क्लिक करा.

Click OK twice.

language-preferences-changed-dialog

10. आता फक्त वर्ड हे एप्लिकेशन बंद करून पुन्हा एकदा चालू करा.

Exit and re-open Microsoft Office Word.

अभिनंदन! तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड २०१० ची भाषा मराठी म्हणून ठेवली आहे.

That’s it, folks, your default language is changed to Marathi!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply